Home मराठवाडा जिल्ह्यात आज ८० कोरोना बाधित रुग्ण

जिल्ह्यात आज ८० कोरोना बाधित रुग्ण

228
0

मराठवाडा साथी न्युज

बीड : सध्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव संथगतीने वाढत आहे. आज आलेल्या अहवालात ८० जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमधून ७७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 
    जिल्हा आरोग्य विभागात आज ७५२ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ६७२ जण निगेटिव्ह आढळून आले तर ८० जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे आष्टी तालुक्यातील असून ते २६ आहेत. त्यापाठोपाठ बीडमध्ये २२, अंबाजोगाई ७, धारूर १, गेवराई ३, केज ३, माजलगाव ४, परळी ४, पाटोदा ६, वडवणी ३ तर शिरूरमध्ये केवळ एक रुग्ण आढळला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here