Home इतर जळगावातील शिवसेनेच्या आमदाराची आमदारकी धोक्यात?

जळगावातील शिवसेनेच्या आमदाराची आमदारकी धोक्यात?

434
0

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघाच्या आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे यांचे आमदारपद धोक्यात आले आहे. लताबाई सोनावणे यांचे टोकरे कोळी अनुसुचित जमातीचा उल्लेख असणारे प्रमाणपत्र नंदूरबारमधील प्रमाणपत्र तपासणी समितीने अवैध ठरवले आहे. माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी याबाबतची माहिती दिली. त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

जळगावातील चोपडा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव होता. या ठिकाणाहून लताबाई चंद्रकांत सोनवणे या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी लताबाई यांच्या अनुसूचित जमातीचा दावा करणाऱ्या प्रमाणपत्राबद्दल उपसंचालक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबार यांच्याकडे तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर समितीसमोर सुनावणी करण्यात आली. मात्र या समितीने काहीही निकाल न वळवी यांनी उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर उच्च न्यायलयाने संबंधित त्रिसदस्यीय समितीला लवकरात लवकर आदेश द्या, असे खडसावले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here