Home Uncategorized कोरोनाची लस भारतात कशी येणार….

कोरोनाची लस भारतात कशी येणार….

61
0


मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली: २०२१ च्या मुहूर्तावर लोकांमध्ये करोनापासून मुक्त होणार आशा देखील जागी झाली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सीरम इन्स्टीट्यूटच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी तज्ज्ञ समितीकडून हिरवा झेंडा मिळाला आहे .दुसरीकडे आज शनिवारी देशातील सर्व राज्यांमधील दोन-दोन शहरांमध्ये लशीचे ड्राय रन घेण्यात येणार आहे. यामुळे जगातील सर्वात मोठ्या करोना लसीकरण अभियान सुरु आहे.

कोरोना लसचा प्रवास
कोरोनाची लस विमानतळावर विशेष कार्गो विमानांद्वारे येणार आहे .लस विशेष रेफ्रिजरेटेड व्हॅन्समधून चार मोठे स्टोरेज केंद्रांवर आणल्या जाणार आहे . करनाल, मुंबई, चेन्नई ,कोलकता येथे ही केंद्रे आहेत.करनाल येथून विशेष रेफ्रिजरेटेड व्हॅन्सद्वारे लस दिल्लीच्या स्टोरेज केंद्रावर पोहोचविली जाणार आहे . लस कार्गो विमानाने थेट दिल्लीला देखील आणण्याची शक्यता आहे. दिल्लीत ठिकठिकाणी एकूण ६२९ केंद्रे तयार करण्यात आली आहेत. केंद्रांवर लस पोहोचविण्यासाठी खासगी रेफ्रिजरेटेड व्हॅन्सची सेवा घेणार.लस कोल्ड स्टोरेज केंद्रापर्यंत पोहोचल्यानंतर ती लसीकरण बूथपर्यंत पोहोचविली जाईल. दिल्लीत सरकारी आणि खासगी रुग्णालये, मोहल्ला क्लिनिक आणि इतर ठिकाणी एकूण १००० लसीकरण बूथ तयार करण्यात आले आहेत.

लसीकरण बूथ कसे असतील

प्रत्येक लसीकरण बूथवर ३ कॅमेरे किंवा चिन्हित क्षेत्रं असेल . पहिले वेटिंग रुम असेल. येथे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकाच्या ओळखपत्रांची तपासणी करणार. लस घेण्यासाठी सर्वप्रथम येथेच पोहोचावे लागणार आहे. पडताळणीनंतर संबंधित व्यक्तीला लसीकरण खोलीत पाठवणार .व्यक्तीला लस दिली जाईल. त्यानंतर संबंधित व्यक्तीला ऑब्झर्व्हेशन रुममध्ये पाठवले जाईल. तेथे अर्धा तास त्या व्यक्तीवर लक्ष ठेवले जाईल. लसीचे साइडइफेक्ट होत आहेत का हे यावेळी पाहिले जाईल.

लसीकरण खोलीत एकावेळी एकाच व्यक्तीला प्रवेश

लसीकरण खोलीमध्ये एकावेळी फक्त एकाच व्यक्तीला पाठवणार. खोलीत ५ लसीकरण अधिकारी असतील. त्यांव्यतिरिक्त एक सुपरवायझर असेल. तो संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून असेल.

लसीकरणासाठी व्यक्तीला MSG करणार

लस देण्यासाठी निवड करण्यात आलेल्या व्यक्तीला लसीकरणाबाबत अगोदरच माहिती देण्यात येईल. त्या व्यक्तीला काही दिवसांपूर्वीत एसएमएसद्वारे ही माहिती दिली जाईल असे सांगितले जात आहे. अमूक दिवशी अमूक वाजता आपण अमूक पत्त्यावर लसीकरणासाठी पोहोचावे अशी सूचना त्या व्यक्तीला देण्यात येईल. लसीकरण अभियानासाठी Co-WIN नावाचे अॅप तयार करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांमध्ये या अॅपवर सेल्फ रजिस्ट्रेशनची सुविधा सुरू करणार आहे .

पहिल्या टप्प्यात ५१ लाख लोकांना टोचणार लस

पहिल्या टप्प्यात ५१ लाख लोकांना करोनाची लस दिली जाणार आहे. यांमध्ये ३ लाख आरोग्य कर्मचारी, ६ लाख फ्रंटलाइन वर्कर्स आणि ४२ लाख ५० हून अधिक वयाचे लोक किंवा ज्यांना गंभीर आजार असेल अशांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here