Home मराठवाडा कॅश लुटीचा बनाव करणाऱ्या दोघांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

कॅश लुटीचा बनाव करणाऱ्या दोघांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

550
0

व्यापार्‍याच्या चालकानेच रचला होता कॅश लुटीचा डाव!

बीड : माजलगाव येथील एका व्यापार्‍याची चालकाला मारहाण करून कॅश लुटल्याची फिर्याद माजलगाव शहर पोलिसात दाखल झाली होती. या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावत दोघा जणांना ताब्यात घेतले. मात्र यामध्ये चक्क व्यापार्‍याच्या चालकानेच कॅश लुटीचा बनाव केल्याचे पोलिस तपासात उघड जाले आहे. 
   २६ ऑक्टोबर २०२० रोजी माजलगाव शहर पोलिस ठाण्यात ३९४, ३४ भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये स्कॉर्पिओ चालक मंकेश मोहन खांडे याने फिर्याद दिली होती की, मी व्यापारी काटकर यांचे ७० हजार रुपये घेऊन जात असताना अज्ञात लोकांनी मला मारहाण करून ती कॅश बळजबरीने लुटली आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत माहिती काढली. त्यानंतर चालक मंकेश मोहन खांडे यानेच ७० हजार रुपये त्याचे मावस भावजी विजयानंद आगे (रा. किट्टी आडगाव ) यांना देऊन कॅश लुटीचा बनाव केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले. त्यावरून काल मंकेश खांडे याला पिंपळगाव मांजरा याला तर त्याचे मावस भावजी विजयानंद आगे याला किट्टी आडगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदरील कारवाई पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी, अप्पर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संतोष जोंधळे, क्षीरसागर, पो.हे.कॉ. काळे, उबाळे तर सायबर सेलचे सलीम शेख, आसेफ शेख, बागवान, ठोंबरे, हरके यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास माजलगाव शहरचे एपीआय राठोड हे करत आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here