Home मनोरंजन ‘किंग खान’ च्या घरात राहण्याची चाहत्यांसाठी ‘सुवर्णसंधी’

‘किंग खान’ च्या घरात राहण्याची चाहत्यांसाठी ‘सुवर्णसंधी’

49
0

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : शाहरुख आणि गौरी खान दिल्लीमधील आपल्या घरात एका जोडप्याला एका रात्रीसाठी राहण्याची संधी देत आहे. परंतु, त्यासाठी जोडप्यांना अर्ज करावा लागणार आहे. या कॅम्पेनला शाहरुख खानची प्रसिद्ध पोजच्या आधारावर ‘होम विथ ओपन आर्म्स’ असे नाव देण्यात आले आहे. या मोहीमेसंदर्भात सांगताना गौरी खान म्हणाली की, घरात तिची आणि शाहरुखची लव्ह स्टोरी तसेच त्यांची मुले आर्यन, सुहाना तसेच अबराहमसोबत त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची झलक पाहायला मिळते.

१३ फेब्रुवारीला मिळणार एका जोडप्याला संधी

शाहरुख आणि गौरी खानच्या या घरात रात्रभर राहण्याची संधी जिंकण्यासाठी चाहते अर्ज करू शकतात. या मोहीमेची सुरुवात १८ नोव्हेंबर रोजी करण्यात आली आहे. विजेत्या जोडप्याला १३ फेब्रुवारी २०२१ रोजी, म्हणजेच व्हेलेंटाईन डेच्या आधल्या दिवशीच्या रात्री शाहरुखच्या घरात राहायला मिळणार आहे. शाहरुखचे दिल्लीतील घर त्याची पत्नी गौरी खानने डिझाइन केले आहे. त्याचे काही फोटो शाहरुखने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केले होते.

https://www.instagram.com/p/CHuWNwaFhpL/?utm_source=ig_web_button_share_sheet

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here