Home क्रीडा कर्णधार रहाणेने पुन्हा ….

कर्णधार रहाणेने पुन्हा ….

431
0


मराठवाडा साथी न्यूज
सिडनी: भारताचा नियमीत कर्णधार विराट कोहलीच्या गैरहजेरीत संघाचे नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणे ने मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळून सर्वांचे मन जिंकले. बॉक्सिंग डे कसोटीत विजय मिळून भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या सामन्यात त्याच्या नेतृत्वगुणाचे कौतुक फक्त भारतीय नाही तर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू देखील करत होते. अजिंक्यने फक्त नेतृत्वगुण दाखवला नाही तर त्यांने शतकी खेळी करून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका साकारली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या सिडनी येथे तिसरा कसोटी सामना सुरू आहे. दुसऱ्या दिवशी मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू केला. या दोन्ही फलंदाजांनी धावांचा वेग वाढवला. ही जोडी फोडण्याचे मोठे आव्हान भारतीय गोलंदाजांपुढे होते. लाबुशेन-स्मिथ जोडीने शतकी भागिदारी केली. ही जोडी भारतासाठी धोकादायक ठरेल असे वाटत असताना रविंद्र जडेजाने भारताला मोठी विकेट मिळून दिली. त्याने लाबुशेनला ९१ धावांवर बाद केले. त्याचे शतक ९ धावांनी हुकले.लाबुशेनचा कॅच भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने स्लिपमध्ये घेतला. रहाणेच्या या कॅचचे कौतुक सध्या सर्वजण करत आहेत. त्याने घेतलेल्या या शानदार कॅचमुळे भारताला मोठे यश मिळाले. सोशल मीडियावर रहाणेने घेतलेल्या या कॅचचे सर्वजण कौतुक करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here