Marathwada Sathi

कंगनाच नवीन #धाक्कड …

मराठवाडा साथी न्यूज
मुंबई :
वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने अभिनेत्री कंगना रणौत विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. कंगना विरोधात दाखल केलेल्या एका याचिकेमध्ये याचिकाकर्त्याने असे म्हटले आहे की, हिंदू कलाकार आणि मुस्लीम कलाकार यांच्यात मतभेद निर्माण करत कंगनाने तिच्या ट्वीट वर सांगितले आहे
याचिकेवर सुनावणी होऊन .


न्यायालयाने कंगना विरोधात राजद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणे या कलमांखाली गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. गुन्हा दाखल केल्यानंतर वांद्रे पोलिसांनी कंगनाला आधी दोन वेळा नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावल होते. मात्र, वैयक्तिक कारणास्तव ती चौकशीसाठी हजर झाली नव्हती.


पोलिसांनी तिसरी आणि अंतिम नोटीस बजावली होती. राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आल्यानंतर कंगना व तिची बहीण रंगोली जबाब नोंदवण्यासाठी आज वांद्रे पोलीस स्थानकात हजर झाल्या होत्या. पोलिसांनी तब्बल २ तास त्यांचा जबाब नोंदवून घेतला. ‘आपण केलेले ट्वीट काही गैर नाही, ट्विटर हे एक सोशल मीडिया प्लेटफॉर्म आहे, त्यामुळे तिथे अनेक ट्विट केले जातात माझ्या ट्वीटमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, असं मला वाटत नाही’ असं उत्तर तिने पोलिसांना जबाबत दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.या चौकशीनंतर कंगनाने एक ट्विट केलं आहे. ती म्हणाली, ‘जर तुम्ही भारतविरोधी असाल तर तुम्हाला पुष्कळ पाठिंबा, काम ,बक्षिसे आणि कौतुक मिळेल. जर आपण राष्ट्रवादी असाल तर आपल्याला एकटे उभे रहावे लागेल, एकटंच लढावं लागेल. तुमचं स्वतःच समर्थनच तुम्हाला उभं करेल.’ असं ती म्हणाली आहे. यासह, ‘तासंतास पोलीस स्टेशनमध्ये ग्रीलिंग केल्यानंतर भोपाळकडे जाताना #धाक्कड’ असं कॅप्शन देखील दिलं आहे.

Exit mobile version