Home मनोरंजन कंगनाच्या निशाण्यावर आता मिस्टर परफेक्शनिस्ट

कंगनाच्या निशाण्यावर आता मिस्टर परफेक्शनिस्ट

6
0

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरत असलेली अभिनेत्री कंगनाच्या निशान्यावर मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजे आमिर खान आला आहे. कंगनाने टि्वट करत नोव्हेंबर २०१५ साली आमिरने केलेल्या त्याच्याच वक्तव्याची आठवण करुन दिली आहे. ज्यात आमिरने म्हटले हेाते की, त्यांना या देशात असुरक्षा अाणि भीतीची भावना िनर्माण होत अाहे.
कंगना राणावतच्या विरोधात मंुबईत शुक्रवारी अजून एक FIR दाखल झाल्यानंतर कंगनाने अामिर खानवर निशाना साधला आहे. कंगनाने आपल्या ट्वीटमध्ये अामिर खानला टॅग करत लिहिले आहे की, इनटाॅलरेंस गँगला जावून विचारा किती कष्ट सहन केलेत त्यांनी या इनटॉलरेंट देशात? जसे रानी लक्ष्मीबाईचा किल्ला तोडला होता तसं माझं घर तोडलं, जसं सावरकरांना विद्रोह केल्यामुळे तुरुंगात टाकलं होतं तसं मला पण तुरुंगात पाठवण्याचा पूर्ण प्रयत्न चालू आहे.
महाराष्ट्र सरकार हुकूमशाहीवादी
कंगनाने आणखी एक ट्विट करत महाराष्ट्र सरकारला हुकुमशाहीवादी सरकार म्हटले अहे. तिने लिहिले आहे की, कँडल मार्च गँग, अवाॅर्ड वापसी गँग बघा हुकुमशाहीचा विरोध करणाऱ्या क्रांतीकाऱ्यांसोबत काय होते? तुम्हा सर्वासारखे नाही. तुम्हाला कोणी विचारत पण नाही. मला बघा, माझ्या जीवनाचे ध्येय हुकुमशाही सरकारशी लढायचे आहे. तुम्हा सर्वासारखे फसवणूक करणे नाही.
तुरुंगात जाण्याची वाट पाहतेय
कंगनाने तिसऱ्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, मी सावरकर, सुभाषचंद्र बोस आिण झांसीच्या राणीची पूजा करते. आज हे सरकार मला तुरुंगातमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच तुरुंगात जाण्याची व त्यांचे दु:ख अनुभवण्याची मी वाट पाहत आहे, ज्याचा अनुभव माझ्या आदर्श व्यक्तीमत्वांनी घेतला आहे. यातून माझे आयुष्य सार्थकी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here