Home औरंगाबाद ‘औरंगाबाद युवा’कडून उल्लेखनीय कार्य मान्यवरांचा पुरस्कार देवून सन्मान

‘औरंगाबाद युवा’कडून उल्लेखनीय कार्य मान्यवरांचा पुरस्कार देवून सन्मान

80
0

मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद । औरंगाबाद युवाचा १५ वा वर्धापनदिन सुभेदारी विश्रामगृहात सोशल डिस्टनसचे पालन करत साजरा करण्यात आला. यावेळी दरवर्षीप्रमाणे युवा शक्ती पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार पत्रकारिता, आरोग्य, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १० व्यक्तींना देण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देवून गौरव केला. याप्रसंगी काँग्रेसचे जेष्ठ नेते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार स.सो.खंडाळकर, पत्रकारिता विद्याचे प्राध्यापक डॉ. शाहीद शेख, कॉग्रेसचे जेष्ठ मोहसीन अहेमद, वाय.के.बिल्डर, शेख अथर, सय्यद साबेर, मुख्तार खान उर्फ बब्बू उपस्थित होते. पत्रकारिता क्षेत्रात जेष्ठ पत्रकार आरेफ देशमुख, शेख मुकर्रम इकबाल, अनिल कचरे, जावेद पटेल, आरोग्य सेवेत डॉ. आमेर पठाण, शासकीय सेवेत राहुन मानवतेची कामगिरी बजावणारे पोलीस कर्मचारी अजिनाथ शेकडे, सामाजिक क्षेत्रात जळगावचे गजानन क्षीरसागर, शेख रशिद शेख लतीफ यांना युवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. मुन्तजीबोद्दीन मोबीनोद्दीन, शरद पवार युवा मंचचे अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष सय्यद अल्ताफ कादर यांना कोरोना योध्दांचे प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी संपादक अब्दुल कय्यूम यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्या चाहत्यांनी केला. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन साजिद पटेल यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अलीम बेग, हसन शाह, शेख अकील, शेख आसिम, हाफीज अली, शेख शकील अहेमद, मेराज खान, असद खान, अकबर खान, अहेमद चाऊस, अनिस रामपूरे, शेख मुजाहेद, शेख हमीदोद्दीन, अशरफ खान, मुसा खान, शेख यासिन यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here