Marathwada Sathi

औरंगाबादेत वाहकांना मास्क घालणे बंधनकारक अथवा होणार दंडात्मक कारवाई- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबादेत वाहकांना मास्क घालणे बंधनकारक अथवा होणार दंडात्मक कारवाई
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता सर्व प्रकारची सार्वजनिक वाहने चालवतांना प्रत्येक वाहन चालकाने मास्क घालून वाहन चालवणे बंधनकारक आहे. सदरील नियमाचे पालन न करणाऱ्या परवाना धारकांविरुध्द नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण ,यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देश दिले.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
  • औरंगाबादेत वाहकांना मास्क घालणे बंधनकारक

नियमाचे पालन न करणाऱ्या परवाना धारकांविरुध्द नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली निर्देश

सदरील नियमांचे पालन न करणाऱ्या विना मास्क वाहन चालवणाऱ्या परवाना धारकाविरुध्द प्रथम गुन्ह्याकरीता (30) दिवस तर दुसऱ्या गुन्ह्याकरीता (90) दिवस परवाना निलंबन होईल तर तिसऱ्या गुन्ह्याकरीता वाहनाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
तसेच ज्या वाहनाचा परवाना लॉकडाऊन काळात संपुष्टात आला असेल अश्या वाहनांची वैधता ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.


मराठवाडा साथी टीव्ही इतर बातम्या

महिलांनी सदैव आनंदी रहावे – सवीता साळवी… मिराकी सलून अॅण्ड स्पाच्या सवीता साळवी यांच्याशी गप्पा
Exit mobile version