Home Uncategorized एस.एम.सेहगल फाउंडेशन तर्फे 250 गरजूंना रेशन किट वाटप

एस.एम.सेहगल फाउंडेशन तर्फे 250 गरजूंना रेशन किट वाटप

421
0

मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद । एस.एम.सेहगल फाउंडेशन फुलंब्री तालुक्यातील 25 गावांमध्ये पाणी,शेती,शिक्षण, व ग्रामविकास सारख्या अनेक विषयांवर गेल्या 2 वर्षांपासून काम करीत आहे.
लॉकडाऊन दरम्यान सुद्धा फाउंडेशन ने अनेक उपक्रम राबविले आहेत. कोरोना काळामध्ये लॉकडाऊन ची शेतमजूर,गरीब,छोटे दुकानदार यांना खुप मोठ्या प्रमाणात झळ बसलेली आहे. पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेला असतानाच एक मदतीचा हात म्हणून तालुक्यातील 250 गरीब व गरजू कुटूंबाना टेक महिंद्रा फाउंडेशन,व एस एम सेहगल फाउंडेशन आणि उर्मी संस्थेच्या माध्यमातून रेशन किट चे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम ओयसिस शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता तसेच शारीरिक अंतर, सॅनिटायझर,व मास्क हे सगळे नियम पाळण्यात आले.गहू आटा, तेल, तांदूळ,दाळ, साखर, मसाले, साबण इ.सह 15 किलो वजनाची निधोना, बिल्डा,आडगाव खु, लिहा, वाकोद, पिंपळगाव गां, सह फुलंब्रीतील गरजूंना किट उपलब्ध करून देण्यात आल्या.
यावेळी रेशन किट चे वितरण उर्मी संस्थेचे राहुल शेटे, कुमार कऱ्हाडे तसेच राजेंद्र वाघ एस.एम.सेहगल फाउंडेशन चे प्रकल्प समन्वयक अमोल भिलंगे यांच्या हस्ते झाले तर गोपीचंद ठाकरे,श्वेता काळे,गजानन मामिळवाड,अमोल सावदेकर,संजय कुदळे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here